सकाळ स्टिंग ऑपरेशन: वेंडर ऐवजी पानटपरीवर मिळतेय 'कोर्ट फी तिकीट' | PanTapri | Mumbai | Sakal Media<br />सकाळच्या प्रतिनिधीने 10 कोर्ट फी तिकीट (Court fee ticket)मागितल्यानंतर 100 रुपयायेवजी पानटपरी विक्रेत्याने 120 रुपयाची मागणी केली. कोर्ट फी तिकीट किंवा कोर्ट फी स्टॅम्प विकण्यासाठी वेंडर नेमण्यात आले आहे. त्याशिवाय कोणालाही अशा तिकीट किंवा स्टॅम्प विक्री करता येत नाही. त्यामुळे वांद्रे लघुवाद न्यायालयाच्या अगदी समोर असलेल्या पानटपरीवर कोर्ट फी तिकीट बेकायदेशीर मार्गाने मिळत असल्यास यामध्ये मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे.<br /><br />#CourtFeeticket #vender #sakalstringoperations #PanTapri #Mumbai #BandraMinorityCourt